पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताब

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, कार्याध्यक्ष मुकुंद वाखारे, रामकृष्ण राणे, मोहन गायकवाड, पंकज पाटील, माणिनी फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

भारती चव्हाण म्हणाल्या, “कामगार कल्याण मंडळ आणि महापालिका यांच्यात २००५ मध्ये करार झाला आहे. त्यानुसार कामगार कल्याण मडंळाच्या मालकीची असलेली नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयमची २८ एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे ठरले. त्यामोबदल्यात महापालिकेने कामगा कल्याण मंडळाला शहराच्या इतर भागातील ५ भूखंड आणि ५ कोटी रुपये रक्कम देण्याचे ठरवण्यात आले. महापालिकेने कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची मगर स्टेडीयमची जागा ताब्यात घेतली. परंतु, गेल्या २५ वर्षांत कामगार कल्याण मंडळाला अवघे १ कोटी रुपये आणि चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक १९५ मधील २० हजार चौरस फूट जागा महापालिकेने दिली आहे. उर्वरित ४ कोटी रुपये आणि चार भूखंड अद्याप महापालिकेने कामगार कल्याण मंडळाला दिलेले नाहीत. यातील दोन जागा प्राधिकरणाकडून ताब्यात घेऊन महापालिका कामगार कल्याण मंडळाला देणार होते. महापालिकेने प्राधिकरणाकडून जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. परंतु, या जागा मंडळाला अद्याप दिलेल्या नाहीत.

 

कामगार कल्याण मंडळाने अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मोशी, सर्व्हे क्रमांक ५ येथील दोन एकर, सेक्टर क्रमांक २५, प्लॉट क्रमांक २९० मधील २५००० हजार चौरस फूट,  सेक्टर २६ जलतरण तलावाजवळ दोन एकर, थेरगाव सर्व्हे क्रमांक ९ मधील दीड एकर आणि चिंचवड सर्व्हे क्रमांक १९५ मधील २० हजार चौरस फूट असे पाच भूखंड हस्तांतरित करण्याचे महापालिकेने ठरवले होते. परंतु, त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी होत नाही. हे भूखंड घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अंमलबजावणी होत नसल्याने मगारांचा संयम आता संपला आहे. हे भूखंड त्वरित कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात न दिल्यास शहरातील कामगार नेहरूनगर येथील अण्णासाहेब मंगर स्टेडियमचा ताबा घेतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.”

  • मावळ न्यूज़
  • 20-10-2018 05:11:00
  • 102


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.