‘कील्लारी’ भूकंपास २५ वर्षें झाल्याच्या आठवणी : गोपाल तिवारी

३० सप्टेंबर १९९३.. ‘कील्लारी’ भूकंपास २५ वर्षें झाल्याच्या निमित्ताने मराठी टीव्ही चॅनेल्सवर चर्चा सुरु आहे..! मी १९९२ साली (सदाशिव-नारायण पेठ) ज्ञानप्रबोधीनी वाॅर्ड मधून 'नगरसेवक' झालो होतो..
कील्लारी भूकंपात मोठी हानी झाली होती.. तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरदराव पवार साहेबांनी महापालिकांना ‘मदत कार्यात’ सहकार्य करण्याचे आवाहन केले होते..विसर्जनाच्या दुसऱ्या दीवशी तशीही सामसुम होती पण ‘कील्लारी’ भुकंपाची बातमी टीव्ही-रेडीओ वर सतत दाखविली जात होती..

 

पुणे मनपात अतिरीक्त आयुक्त मा बापू साहेब धामणे यांचे कार्यालयांत दु ४वा आम्ही काही नगरसेवक - पदाधिकारी जमलो. व पुणे मनपा तर्फे १८० आरोग्य सेवकांची टीम (५ पीएमटी बसेस सह) ऊप आरोग्य प्रमुख डाॅ दिलीप परदेशी समवेत इतर आरोग्य खात्यातील व कचरा विभागातील मुकादम, बिगारी इ सह ’कील्लारी’ भूकंप ग्रस्तांच्या मदतीस जाण्याचे ठरले. मनपा सेवकांची तेथे रहाण्याची व जेवण्याची सोय आहाला करायची होती.
 
त्या करीता फावडी, कुदळी, घमेली, ताडपत्र्या, रस्सी - दोर इ मदत कार्यास आवश्यक ती सामग्री तसेच या सेवकांकरीता धान्य - शिधा इ व आचारी घेंऊन मा महापौर अंकूश काकडे यांचे नेतृत्वाखाली मी, आबा बागूल, अरूण धिमधिमे, विरेंद्र कीराड, जयंत भोकरे, शाम सातपूते इ दुसरेच दीवशी कील्लारी कडे निधालो. तेथे दुसरे दीवशी पहाटे ४ चे सुमारास पोहोचताच डाॅ पद्मसिंग पाटील यांची व तत्कालीन पोलीस अधिक्षक मा शिवाजीराव बारावकर स ७ वा. भेट झाली. त्यांचे कडुन सुचना इ घेवुन व त्यांनी नेमुन दीलेल्या गावा जवळ जाण्यास सु ११ वाजले..
पोहोचतां क्षणीच् सेवकांच्या अनेक टीम्स बनवुन गावकरी व नातेवाईक सांगतील त्या ठीकाणी गेले..
  • तब्बल ४ दीवस मुक्काम करुन अनेक ढीगारे ऊपसले. प्रेते, सामान - चीज वस्तू ढीगार्यांखालुन काढीत होतो.. स ७ पासुन सायं ७ पर्यंत अंधार होई पर्यंत अथक परीश्रम सर्व सेवक वर्ग करीत होता आम्ही देखील सर्व सोबत आलेले नगरसेवक ‘मदत कार्यात’ झोकुन देवुन काम करीत होतो. आपल्या मनपा सेवकांची खाण्या पीण्याची व्यवस्था बघणे त्या व्यतीरीक्त ऊर्वरीत वेळेत आपत्तीग्रस्तांच्या सूचने व सांगण्या प्रमाणे ढीगारे ऊपसणे..

  • त्यांचे बेपत्ता नातलगांचे ‘मृतदेह’ सापडले की त्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने मन हेलावून जात..! तेथील जीवंत माणसे मात्र अत्यंत ऊदास, निर्विकार व बधीर झाली होती.. अनेकांना सावरण्यात देखील वेळ जात होता.. एकाद्या कुटुंबियांची ‘सोने-नाणे, रोकड वा जमा पूंजी ची पेटी ढीगार्याखालुन मिळाली तर चेहऱ्यावर किमान समाधान व आशेचा किरण दिसायचा..! 

काहीजण तर चीज़-वस्तू सापडली तरी कुटुंबियच् गेली तर आता याच् काय करायचे (?) म्हणून अनास्था दाखवीत होती..सर्व मरणासन्न वातावरणात काही ‘मानवतावादी’ अल्पकार्य पुणे मनपा च्या माध्यमातून आम्ही करू शकलो याच् समाधानाच्या भावनेतून आम्ही सुन्न मनाने परतलो..! कील्लारी येथील अनुभव - गप्पा आपल्या इतर सभासद मित्र अधिकारी वर्ग, पत्रकार इ बरोबर अनेक दीवस मनपात चालली होती..!

  • पुणे रेपोटर
  • 01-10-2018 06:23:00
  • 108


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण स.. पूर्ण बातमी पहा.

राष्ट्रवादीत युवकांनी तुफान भरलंया...कोते पाटलांचा.. पूर्ण बातमी पहा.