मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेना

मावळ न्यूज़ – मावळ तालुक्‍यातील झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता काबिज केली आहे. गेव्हंडे-ठाकूरसाईच्या सरपंचपदी नारायण बोडके (भाजपा), डोंगरगाव- केवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील येवले (शिवसेना), तुंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वसंत बोडके (भाजपा), चावसर-केवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ कुडले (भाजपा) यांनी आपापल्या विरोधकांचा पराभव करत विजयमाला परिधान केली आहे. पवन मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला असून ठाकूरसाई, गेव्हेडे तुंग व चावसर या तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा या भागात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मिळाली संधी

वडगाव नगरपंचायतीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने मावळ तालुक्‍यात भाजपाचे वर्चस्व कमी झाल्याचे चर्चांना उधाण आले होते. यामुळे चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी असल्याचे मानत पुन्हा एकदा जोर लावला होता. या तीनही ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

मावळातील ग्रामपंचायत निकाल व सरपंच पुढीलप्रमाणे

 ठाकूरसाई- गेव्हंडे ग्रुप ग्रामपंचायत:- सरपंचपदी नारायण बोडके (239),

प्रभाग क्रमांक:- 1- निर्मला राजेंद्र भोसले (90), अरविंद नारायण रोकडे (बिनविरोध),

प्रभाग:- 2- रामदास लक्ष्मण खैरे (104), रेखा रामदास ठाकर (110),

प्रभाग:- 3- कमल ज्ञानदेव मानकर, धर्मेंद्र निवृत्ती ठाकर (दोघेही बिनविरोध), एकजागा रिक्त

 

केवरे-डोंगरगाव ग्रामपंचायत :- एकूण नऊ जागा पैकी दोन जागा बिनविरोध तर सरपंचपदी शिवसेनेचे सुनिल बाळकृष्ण येवले (456)

प्रभाग क्रमांक:- 1- शुभांगी विश्वास कोळसकर (291),

जयश्री राजेंद्र दळवी (269), प्रदीप गंगाराम घोलप (300).

प्रभाग क्रमांक:-2- सतीष श्रीरंग चव्हाण (226), अनिता अनंत दळवी (226), राजश्री राजेश जोगले (बिनविरोध).

प्रभाग क्रमांक :-3- सविता दिनेश जायगुडे (320), सुनिता सुभाष खोले (244), ज्ञानेश्वर महादू वाघमारे (बिनविरोध)

 

तुंग ग्रामपंचायत :- सरपंचपदी वसंत नथू म्हसकर(411), सिताबाई दगडू लोहेकर (103), शुभांगी संदिप पाठारे (121)

प्रभाग क्रमांक :-2- विलास लक्ष्मण वाघमारे (147), शांताराम सतू पाठारे (150), शांताबाई नामदेव पांगारे (139), प्रभाग :-3- शंकर भागू आखाडे (140), उषा राघू ठोंबरे (145)

 

चावसर-केवरे :- सरपंचपदी नवनाथ बबन कुडले (318),

प्रभाग क्रमांक :-1- रघुनाथ शंकर पवार, कांताताई नारायण पवार (दोघे बिनविरोध),

प्रभाग :-2- भाऊ चिंतू पवार (134),

सुवर्णा संतोष राऊत, पल्लवी संजय गोणते (बिनविरोध),

प्रभाग क्रमांक :- 3- सखुबाई भाऊ पवार, भाऊ रोंघु दळवी (बिनविरोध)

  • मावळ न्यूज़
  • 27-09-2018 22:38:00
  • 87


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.