उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन

मावळ न्यूज़ : गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया... असा जयघोष करीत, ढोल ताशांच्या निनादात, विघ्नहर्त्या गजाननाचे अर्थात लाडक्या गणपती बाप्पांचे उद्योगनगरीत गुरूवारी आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणशोत्सवावर भाविकांनी भर दिला आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. कामगार कष्टकऱ्यांची नगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड नगरीचा नूर काही औरच होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असणारी उत्कंठा संपली. आज सकाळपासूनच उद्योगनगरी गणेशमय झाली होती. गणरायाची महती सांगणारी गीते कानावर पडत होती. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसभर मंगलमय असेच होते. प्राणप्रतिष्ठापनेसाठी आज पहाटे ब्राम्ह मुहूर्तापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त होता. त्यामुळे घरगुती उत्सवाची लगबग अगदी सकाळपासूनच सुरू होती. सजावट करण्यात आणि बाप्पाचे स्वागत करण्यात कुटुुंबं रंगल्याचे चित्र घरोघरी दिसत होते. पारंपरिक वेश परिधान करून भाविक गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....’ असा जयघोष कानी पडत होता. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत गणरायाला आणले आणि प्रतिष्ठापना केली. गुलाल विरहीत मिरवणूक आणि ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणावर दिसून आला. ढोल-ताशांच्या दणदणाटात बाप्पाचे स्वागत करण्यात अाले. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तसेच काही मंडळांनी पहिल्याच दिवशी देखावे सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. तसेच सजावटीतही कार्यकर्ते मग्न असल्याचे दिसून आले.फुलांची सजावट, थर्मोकोलचा वापर कमीघरगुती गणेशोत्सवासाठी मखरे वापरली जातात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिक आणि थर्मोकोलला बंदी असल्याने भाविकांनी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणावर भर दिल्याचे दिसून आहे. थर्मोकोलची मखरे बाजारपेठेतून गायब झाल्याचे दिसून आले. तसेच प्लॉस्टिक ऐवजी कागदी फुलांचा वापर अधिक दिसून आला. तसेच कागदी मखरेही अधिक प्रमाणावर दिसून आली. त्यामुळे पर्यावरण पुरक उत्सवाचा वेगळाच रंग दिसून येत होता.

  • मावळ न्यूज
  • 13-09-2018 22:18:00
  • 93


लोकांच्या प्रतिक्रिया

Ranjeet Ghodake 23-09-2018 15:57:00

गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया..

तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.