मा.आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित मावळ प्रबोधिनीच्या वतीने बाकड

मावळ न्यूज़ :- मावळ तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार श्री.दिगंबरशेठ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व मावळ प्रबोधिनी संस्थेच्या वतीने संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळाच्या माध्यमातून गावोगावी व वाड्यावस्त्यावर्ती, मंदिराजवळ,चावडीजवळ,मुख्य चौक, एस.टी. स्टँड, बस स्टॉप अशा ठिकाणी जेष्ठ नागरिक,महिला व शालेय विद्यार्थी यांना बसण्यासाठी बाकडे (बेंच) वाटण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ रविवार दि.09/09/2018 सकाळी 10:00 वाजता कुंडमळा, इंदोरी, मावळ येथे करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा भाजपाचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर साहेब पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष मावळचे आमदार संजय ( बाळा ) भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा माझी संघचालक सुरेशभाई शहा, पुणे जिल्हा भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत (अण्णा) ढोरे,मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळस्करमावळ पंचायत समितीचे माझी सभापती एकनाथराव टिळे, यांनी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांना शुभेच्छा दिल्या,मावळ पंचायत समितीचे माझी सभापती ज्ञानेश्वर दळवी,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर (सर), माझी संचालक भाऊसाहेब पाणमंद, माझी संचालक तानाजी भोंडवे,महाराष्ट्र प्रदेश आरपीआय सरचिटणीस चांद्रकांताताई सोनकांबळे, प्रॉफेसर मनोज वाखारे, माझी जिल्हा परिषद सदस्य शेखरभाऊ भोसले, बंडोपंत भेगडे, पोपटराव भेगडे पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्च्या माझी अध्यक्ष संदीप सोमवंशी हभप कीर्तनकार भगवान महाराज शेवकर,घोरवडेश्वर देवस्थां ट्रस्टचे दत्ता मामा तरस, मधुकर बोडके, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड माझी उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, यांसह पुणे जिल्यातील भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मावळतालुक्याच्या विकासात व मावळ तालुका भाजपाची संघटना पाया भक्कम करण्यात दिगंबरशेठ भेगडे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे अध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी व्यक्त केले तसेच राजकारणात राहून वारकरी संप्रदाय व भाजपाचे नाव याला डाग लागु दिला नाही,कोळशाच्या खाणीत राहून देखील हिऱ्या प्रमाणे राहिल्याचे भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे हे नेहमी आवर्जुन उल्लेख करत असल्याचे एकनाथराव टिळे यांनी उल्लेख केला. निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व तळा गावातील कार्यकर्ते यांना मानसन्मान देण्याचे काम दादा नी गेली 25 ते 30 वर्ष तालुक्यात काम केल्याचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर यांनी सांगितले. तसेच अनेकसभापती ,उपसभापती, जिल्ह्या परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांनी दादा च्या आशिर्वादा मुळे राजकारणात यशस्वी झाल्याचे सांगितले. तालुक्यात स्व. नाथुभाऊ भेगडे, विश्वनाथ भेगडे, शिवराम येवले, पांडुरंगमामा शेलार, यांच्या मार्गदर्शनाखाली व शंकरराव शेलार, सुरेशभाई शहा, शिवाजीराव पवार, भागूजी आप्पा भेगडे, जगन्नाथ भेगडे,या सारख्या असंख्य जेष्ठांच्या मार्गदशना खाली व उपस्थित अनेक कार्यकर्ते यांच्या बरोबर तालुक्यात सत्ता व संपत्ती नसताना देखील शेतकरी व वारकरी यांच्या प्रश्न व स्मपर्काच्या माध्यमातून काम करून 30 वर्षा पासून भाजपा पक्ष वाढवणे व सत्ता आणणे व ती टिकवण्याचे काम केल्याचे माझी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांनी उल्लेख केला व सर्व जेष्ठनेते व कार्यकर्ते यांचे ऋण दादांनी व्यक्त केले. दादा व त्या काळातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अडीअडचणी वर मात करून पक्ष संघटना वाढवली त्याच्या जीवांवर आज मावळात भाजपची सत्ता आभादीत आहे व व तीच्या कामात भर टाकण्याचे मी यांच्यासारख्या सर्व जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी सांगितले.गेली अनेक वर्ष तालुक्यात जेष्टत्वाच्या नात्याने मी तालुक्यातील भाजपाची संघटना एकसंघ राहण्यासाठी सर्वोतोपरी पर्यंत केले परंतु आता वयोमानाने तबेत साथ देत नाही तर मला खो देऊन दिगंबरशेठ भेगडे यांनी ती जागा सांभाळावी अशी भावनीक साद घालत दादानां वाढदिवसाच्या शुभेच्छा व संधीच्या जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांनी दिल्या. दादांच्या कार्यातून प्रेरणा घेत जनसामान्य साठी तालुक्यात काम करत असुन तालुकातील जनतेचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी मावळ प्रभोधिनी व भाजपच्या माध्यमातून सातत्याने काम करीत राहणार असून त्यातीलच एक भाग म्हणुन संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळाच्या माध्यमातून गावोगावी व वाड्यावस्त्यावर्ती, मंदिराजवळ,चावडीजवळ,मुख्य चौक, एस.टी. स्टँड, बस स्टॉप अशा ठिकाणी जेष्ठ नागरिक , महिला व शालेय विद्यार्थी यांना बसण्यासाठी बाकडे (बेंच) वाटण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ दादांच्या जन्मदिनी आज करत आहोत असे रविंद्र भेगडे संस्थापक मावळ प्रबोधिनी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना करताना मत व्यक्त केले. सतीश भेगडे यांनी सूत्रसंचालन केले.उपसभापती शांताराम कदम यांनी आभार मानले.अमोल जगन्नाथ शेटे व संदीप बाळासाहेब शेळके ,नगरपरिषद रघुविर शेलार , मनोहर दिगंबरशेठ भेगडे,गजानन शेलार,संदीप शिवाजीराव पवार ,दत्ताशेट भेगडे , संतोष गुलाबराव राक्षे,संदेश भरत भेगडे,अमित रामदास भेगडे,भगवान भसे, विनीत भेगडे,काळूरामशेठ पवार , रणधीर भेगडे, विनायक भेगडे, संजय भेगडे,अशोक भेगडे, मयुर भेगडे, जय भेगडे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

  • मावळ न्यूज
  • 13-09-2018 21:50:00
  • 110


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे निधन.. पूर्ण बातमी पहा.