सोशल मिडीयांचा अवलिया

सोशल मिडीयांचा अवलिया आजच्या काळांमध्ये सोशल मिडीयांना आपल्यावर प्रचंड पगडा आहे. आजचे तरूण त्याबरोबरच सर्व वयोगटांतील व्यक्ती त्या पासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यांचे फायदे किती आणि तोटे किती हा संशोधनांचा आणि चिंतनाचा विषय असताना सध्या तरी सोशला मिडीया म्हणजेच फेसबुक, व्हॉटसअॅप, व्टिटर हे जीवनावश्यक झाले आहे. आपल्याला विचार पडतो सर्वसामान्य जनतेचे ठिक आहे. पण, सेलिब्रेटी, राजकीय क्षेत्रांतील, अभिनेते आपल्या प्रचंड व्यापांतून सोशल मिडीयाकडे कधी वेळ देत असतील. तेव्हा याच माध्यमांतून शोध घेत असताना या सर्व मान्यवरांचे सोशलमिडीया सांभाळणारा अवलिया सापडला. हा कोणी वयस्कर अथवा आयटी क्षेत्रांतील नसून अवघ्या 18 वर्षांचा तरूण आहे वरुण नायर. सर्वात तरुण प्रतिभावंत व्यवस्थापक आणि उद्योजक वरुणने खूप कमी वयात उद्योजकता आणि सोशल मिडीया व्यवस्थापन सुरू केले आहे. तो 12 वी चा विद्यार्थी आहे आणि भारतातील टॉप-सेलिब्रिटींचे सोशल मिडीया व्यवस्थापन करीत आहे. त्यामध्ये मिस इंडिया, बिग बॉस फेम कलाकार, अभिनेता, राजकीय नेते. युट्युबर आणि बरेच काही. वरूणशी संवाद साधला असता तो म्हणाला, मी मुळचा केरळचा आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने गेली 8 वर्षे मुंबईत असतो. आई गृहिणी आहे. लहानपणांपासून मला सोशल मिडीयांचे आकर्षण होते. त्यामध्ये मी हातखंडा मिळवला होता. फेसबुकच्या माध्यमांतून मला काही सेलिब्रेटी भेटले. आज बऱ्याच सेलिब्रेटीचे खाते मी चालवत असतो. बऱ्यांच वेळा या लोकांना जनतेच्या रोषांस सामोरे जावे लागते. टिका होते. तेव्हा यांना तो संदेश मी देत असतो. "मला नेहमी काहीतरी वेगळे करायचे आहे या वयात मी प्रतिभावंत व्यवस्थापक म्हणून माझ्या पदावर पोहोचलो. मी सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्या प्रवासाची सुरवात केली आणि हळूहळू मला यश मिळत आहे. याव्यतिरिक्त माझ्या कुटुंबाकडून मला फार चांगले समर्थन मिळाले. त्यांच्या समर्थनाशिवाय मी या स्थितीत पोहोचू शकलो नसतो. सध्या मी प्रथम वर्ष शिकत आहे. पुढे मला ऑर्टिस्ट, सेलिब्रेटी व्यवस्थापन शिकायचे आहे. त्यांने सांगितले मला या क्षेत्रांत करियरची चांगली संधी मिळाली आहे. या सर्व सेलिब्रेटीनी माझ्यावर विश्वास टाकला असून लहान भावांसारखे वागवतात. ऐवढ्या कमी वयांत हे क्षेत्र पादांक्रांत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. https://www.facebook.com/VarunNairofficial/ https://www.instagram.com/varun https://twitter.com/varunnaiir

  • की. कामटे
  • 12-09-2018 23:33:00
  • 494


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

‘कील्लारी’ भूकंपास २५ वर्षें झाल्याच्या आठवणी : ग.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण स.. पूर्ण बातमी पहा.

राष्ट्रवादीत युवकांनी तुफान भरलंया...कोते पाटलांचा.. पूर्ण बातमी पहा.