शिवसंपर्क अभियानाला शिवसेना सुरुवात करणार

मावळ न्यूज – शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला असून या अभियानाला लोणावळा शहर व मावळ तालुक्यातून नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. मावळ तालुक्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण व दुर्गम आहे. या भागात अनेक नागरी समस्या असून त्या आजतागायत सोडविल्या गेल्या नसल्याने या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर जाऊन समस्या जाऊन घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने शिवसेना करणार आहे. सोबतच शिवसेनेच्या सर्व शाखांना भेटी देत पक्ष संघटना बळकटीवर भर देण्यात येणार असल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी मावळ महिला आघाडी संपर्कप्रमुख लतिका पास्ते, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक सुरेश गायकवाड, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख महेश केदारी, विरोधी पक्षनेत्या व लोणावळा शिवसेना महिला आघाडी संघटिका शादान चौधरी, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, लोणावळा शहरप्रमुख सुनिल इंगुळकर, महिला आघाडी सहसंघटिका संगिता कंधारे, उपसंघटिका अनिता गोणते, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांच्यासह विभागप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 26-08-2018 06:31:00
  • 80


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वावर नाराज होत राष्ट्रवादी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयाने दिंडी निमित्त देहूगावात र.. पूर्ण बातमी पहा.