पक्षातील घरभेदी कार्यकर्त्यांमुळेच पक्षाची नाचक्की – रामनाथ वारिंगे

मावळ न्यूज – पक्षातील कार्यकर्ते नेमक्या वेळी पक्षातून बाहेर पडत असल्याने पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून वडगाव-कातवी नगरपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाला नगराध्यक्ष पदासाठी पराभव तर उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधकांच्या कुबड्या घेण्याची वेळ आली आहे. ही पक्षाची नाचक्की पक्षातील घरभेदी कार्यकर्त्यांमुळेच झाली असल्याचा संताप भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ वारिंगे यांनी व्यक्त केला. कान्हे फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारिंगे पुढे म्हणाले की, “ज्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षविरोधात काम केले. त्याच कार्यकर्त्यांनी वडगाव-कातवी नगरपंचायत निवडणुकीत देखील पक्षविरोधात काम केले आहे. अशा कार्यकर्त्यांवर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली असता, पक्षातील वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळे वडगाव-कातवी नगरपंचायतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. आजवर तालुका आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पक्षाचे काम कशा प्रकारे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करायचे, याचे उपदेश दिले. त्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना यापुढे उपदेश देण्याची गरज नाही. कारण ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्याने वेळोवेळी सिद्ध करून दाखविले आहे. वडगाव मावळ ही ग्रामपंचायतीचे आता नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे वडगावचे आणखी एक मंडल करून त्याद्वारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना देहूरोड, लोणावळा, तळेगाव सारख्या भागातून काम करण्याची संधी पक्षाने द्यायला हवी. सध्या पक्षात आयरामांना पायघड्या घातल्या जात आहेत, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना उपेक्षेला सामोरे जावे लागत आहे. याकडे देखील वरिष्ठ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा समज सर्व कार्यकर्त्यांमध्ये पसरत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तालुकास्तरावरील कार्यकारिणी आणि काही कमिटीच्या पदाधिका-यांची फेररचना करायला हवी. पंचायत समितीवर सदस्य पदी निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना देखील पंचायत समितीवर कार्य करण्याची संधी द्यावी. मोठ्या पक्षात काम करताना अशा घरभेदी कार्यकर्त्यांसोबत राहून आपला स्वाभिमान गमावण्यापेक्षा अन्य लहान पक्षात जाऊन कार्यकर्ता म्हणून काम करणे योग्य, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. पक्षातील काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही परिस्थिती कायम ठेवली तर पक्षाला नगरपंचायती सारखाच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

  • मावळ न्यूज
  • 25-08-2018 04:08:00
  • 96


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

..|● शुभ दिपावली ●|.... पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणूक माघारीनंतर लढतींचे च.. पूर्ण बातमी पहा.

शाहू - फुले - आंबेडकर यांना आदर्श मानत असल्याने फु.. पूर्ण बातमी पहा.

मातंग मुलांच्या मारहाण प्रकरणात मंत्री गिरीश महाजन.. पूर्ण बातमी पहा.

नऊ वर्षात चुकीच्या कामासाठी मी एकही फोन केला नाही .. पूर्ण बातमी पहा.

नाथाभाऊ, तुम्ही कोण ? हिंदुत्ववादी, ओबीसी की बहुजन.. पूर्ण बातमी पहा.

गौरी लंकेश यांच्यावर मीच चार गोळ्या झाडल्या, परशुर.. पूर्ण बातमी पहा.

मी कॅबीनेटमंत्री होणार का, ते मुख्यमंत्र्यांनाच मा.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

मोदी सरकारचे कामगार हिताकडे दुर्लक्ष : डॉ. रत्नाकर.. पूर्ण बातमी पहा.