पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बांधवानी साजरी केली बकरी ईद

मावळ न्यूज- मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली बकरी ईद आज सर्वत्र उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. तळेगाव स्टेशन मशिदीमध्ये आज सकाळी सामूहिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी केरळमधील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी मुस्लिम बांधवानी रोख स्वरूपात एक लाख रुपये गोळा केले. सकाळी साडेसात वाजता मौलाना शाहीद सिकिलकर यांनी व साडेआठ वाजता हाफीज निसार यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना शाहिद यांनी सामाजिक सलोखा आणि ईश्वराबद्दल निष्ठा राखण्याचे आवाहन केले. नमाज पठणासाठी मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. या प्रसंगी केरळमधील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष आयुब सिकिलकर यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाज बांधवाकडून रोख स्वरुपात एक लाख रुपये जमा करण्यात आले. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब व त्यांचे सहकारी इतर समाजबांधवानी ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रस्टचे बाबा मुलानी, राजू अत्तार, जमीर नालबंद, आयुब मणेर, आनंद सादुले, नदीम शेख, इरफान जमादार, शेख सर,डॉ मुबारक खान, सय्यद पाशाभाई, अब्दुल हाफीसभाई, जलालखान अलमेल, शमीम, सलमान,अत्तार,नौशाद शेख, नाजीम अत्तार, इब्राहिम शेख, इम्रान शेख व ऊम्मती यंग सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 23-08-2018 05:01:00
  • 48


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.