तळेगावच्या मराठा क्रांती चौकाचे स्वातंत्र्यदिनी अनावरण

मावळ न्यूज – सकल मराठा समाज तळेगाव दाभाडे आयोजित मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून ऑगस्ट क्रांतिदिनाच्या नामकरण करण्यात आलेल्या, तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील “मराठा क्रांती चौकाच्या स्मारकरुपी कोनशिलेचे” अनावरण गुरुवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ९ ऑगस्टला झालेल्या मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाचे उगमस्थान आणि प्रतिक म्हणून सिंडिकेट बॅंकेसमोरील चौकाला मराठा क्रांती चौक असे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. या संदर्भातील ठराव तळेगाव दाभाडे नगरपालिकेत मंजूर करुन घेण्याची घोषणा मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी आंदोलकांसमोर केली होती. त्या अनुषंगाने उद्योजक किशोर आवारे यांनी पुढाकाराने सदर चौक कोनशिला बांधकाम आणि सुशोभीकरण युद्धपातळीवर करवून घेतले. काळ्या रंगाच्या ग्रॅनाईटने मढविण्यात आलेल्या कोनशिलेचे काम अंतिम टप्प्यात असून,अनावरण गुरुवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी सकाळी १० वाजता आमदार बाळा भेगडे, सत्येंद्रराजे दाभाडे, अंजलीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

  • मावळ न्यूज
  • 13-08-2018 06:04:00
  • 215


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.