पिंपरीतील खासदार, आमदारांच्या बंगल्याबाहेर मराठा मोर्चाचा घंटानाद

मावळ न्यूज़ : मराठा मोर्चाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवडमधील दोन खासदार आणि तीन आमदारांच्या बंगल्याबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर, शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ते केले गेले. यावेळी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व या पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी त्यांचे निवदेन स्वीकारले. आपण समाजाबरोबर असून आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार,खासदार जागे व्हा, य़ासह एक मराठा,लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे अशा घोषणा घंटानाद करून आंदोलक देत होते. यावेळी सर्व खासदार,आमदारांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने आढळराव यांच्यासह मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते घरी वा कार्यालयात नव्हते. त्यामुळे त्यांचे आप्त आणि पीएंकडे आंदोलनकर्त्यांनी आरक्षणासह इतर मागण्यांचे नि ;वेदन दिले. त्यात कोपर्डी घटनेतील आरोपींना तातडीने फाशी, मराठा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी सवलतीची अंमलबजावणी आदी मागण्या आहेत. सकाळी नऊ वाजता साबळे यांच्या निवासस्थानापासून हे घंटानाद आंदोलन सुरु झाले. नंतर, ते बारणे, चाबूकस्वार,जगताप, लांडगे यांच्या बंगल्याबाहेर,तर आढळरावांच्या कार्यालयासमोर ते करण्यात आले. शिवसेनेचे आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार हे घरी नव्हते. त्यामुळे त्यांचे पीए विजय जगताप यांनी आमदारांच्या वतीने आंदोलकांकडून निवेदन घेतले.

  • मावळ न्यूज
  • 09-08-2018 11:35:00
  • 84


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.