पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद

मावळ न्यूज – पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे. या मागणीसाठी पुणे-मुंबई मार्गावर मराठा आंदोलकांनी उर्से टोल नाका येथे रास्ता रोको केला आहे. आंदोलनात मराठा समाजातील आंदोलक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहे. त्यामुळे आज गेल्या आठ तासांपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब तब्बल 5-7 किमी रांगा लागल्या आहेत. प्रवासी गेल्या सात ते आठ तासापासून खोळंबले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जुना पुणे-मुंबई महामार्ग नुकताच खुला झाला असून द्रुतगती मार्गावरची वाहतूक तेथून वळवण्यात आली आहे.

  • मावळ न्यूज
  • 09-08-2018 11:16:00
  • 84


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पवारांच्या बेळगावमधील सभेसाठी जय्यत तयारी.. पूर्ण बातमी पहा.