माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इंद्रायणी मॅरेथॉन’ स्पर्

मावळ न्यूज- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथे ‘इंद्रायणी मॅरेथॉन 2018’ या स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता मारुती मंदिर येथे होणार आहे. याबाबतची माहिती इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकापासून या स्पर्धेचा प्रारंभ होऊन इंद्रायणी कॉलेज येथे सांगता होणार आहे. तीन किमी अंतराची हे स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र कन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर, रोटरीचे प्रांतपाल डॉ. शैलेश पाळेकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू हर्षदा जोशी, राजेश पठाडे, नितीन म्हाळसकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे असणार आहेत. ही स्पर्धा मावळ तालुका पातळीवर विविध गटांमध्ये होणार आहे. इयत्ता 7 वी ते 10 वी मुले (प्रथम गट), इयत्ता 7 वी ते 10 वी मुली (व्दितीय गट),खुला गट पुरुष (तृतीय गट), खुला गट महिला (चतुर्थ गट) अशा चार गटांमध्ये होणार आहे. त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विशेष गट देखील या स्पर्धेत धावणार आहे. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. इयत्ता 7 वी ते 10 वी मुले व मुली प्रथम क्रमांकास 5000 रुपये , द्वितीय क्रमांकास 3000 रुपये आणि तृतीय क्रमांकास 2000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. खुला गट महिला व पुरुष प्रथम क्रमांक 11000 रुपये, द्वितीय क्रमांक 7500 रुपये आणि तृतीय क्रमांकास 5000 रुपये तर ज्येष्ठ नागरिक गटासाठी प्रथम क्रमांक 7000 रुपये , द्वितीय क्रमांक 5000 रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 3000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक देखील देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास स्पर्धेपूर्वी टी- शर्ट आणि स्पर्धेनंतर प्रमाणपत्र आणि सहभागी शाळांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेनंतर लगेचच होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विनामूल्य प्रवेश असून मावळातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, शाळांमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडा शिक्षकांकडे तर खुल्या गटातील स्पर्धकांनी इंद्रायणी महाविद्यालयातील प्रा. सुरेश थरकुडे (9823773797), प्रा. प्रतिभा डंबीर (9545153484), गोरख काकडे (8180818091) यांच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या स्पर्धेचे संयोजन मावळ तालुका क्रशर संघटनेचे अध्यक्ष तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष रोटरियन विलास काळोखे व लायन संदीप काकडे हे करणार आहेत. पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष रोटरियन विलास काळोखे व लायन संदीप काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, तळेगाव रोटरी सिटीचे दिलीप पारेख, उद्योजक सागर पवार, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे आदी उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 04-08-2018 04:43:00
  • 80


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.