समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?, महापौर, विरोधी पक्षनेते

मावळ न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या च-होली, चिखली, जाधववाडी गावाच्या लोकप्रतिनिधींकडे पालिकेतील महत्वाची पदे आली आहेत. महापौर, विरोधी पक्षनेते, महिला व बालकल्याण समिती यासह समाविष्ट भागातील काही सदस्य स्थायी समितीचे सदस्यही आहेत. त्यामुळे आता तरी समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे थांबून तेथील विकासाला चालना मिळणार का, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात होत आहे. चिखली, जाधववाडी, च-होली, दिघी, बोपखेल हा भाग सन 1997 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाला. महापालिकेत समाविष्ट होऊन 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या भागाला महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. तसेच हा भाग नेहमीच विकासापासून वंचित राहत होता. त्यामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी वारंवार विकास कामाबाबत आवाज उठवित होते. समाविष्ट गावात विकास कामे केली जात नसल्याचा आरोप वारंवार केला जात होता. 2014 ची विधानसभा निवडणुक अपक्ष लढवलेल्या आमदार महेश लांडगे यांना सामाविष्ट गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते. याची परतफेड म्हणून त्यांनी समाविष्ट गावातील नगरसेवकाला महापौर केले. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचा पहिला महापौर समाविष्ट गावाचा केला होता. च-होलीचे प्रतिनिधित्व करणारे नितीन काळजे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाला पहिल्यांदाच समाविष्ट गावाला पालिकेतील सर्वांत महत्वाचे पद मिळाले होते. काळजे यांनी देखील पदाचा पुरेपुर लाभ उचलत च-होलीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात समाविष्ट गावात 425 कोटी रुपयांची रस्ते करण्यास मंजुरी मिळाली असून रस्त्यांची कामे देखील सुरु आहेत. त्यामुळे समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला असून त्यांचे उत्तराधिकारी समाविष्ट गावातीलच जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे राहुल जाधव होणार आहेत. शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून त्यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून सलग दुस-यावेळी समाविष्ट गावाकडेच शहराचे महापौरपद असणार आहे. 2012 मध्ये नगरसेवक असताना जाधव समाविष्ट गावातील प्रश्नांवर नेहमी आक्रमकपणे प्रश्न मांडत होते. आता तेच शहराचे प्रथम नागरिक होणार असून त्यांनी समाविष्ट गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद देखील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता साने यांच्याकडे आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे या देखील समाविष्ट गावातील आहेत. त्यामुळे आता तरी समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे थांबून तेथील विकासाला चालना मिळणार का, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

  • मावळ न्यूज
  • 02-08-2018 03:41:00
  • 24


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवि.. पूर्ण बातमी पहा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.