महापौरपद खेचून आणले : चिंचवडला उपमहापौरपदाचा मान

मावळ न्यूज़ –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव, तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित असून, शनिवारी (दि.4) होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी(दि.31) दुपारी तीन ते पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. यावेळेत सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित झाली आहे. शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पिठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षा नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत. जाधव यांच्या निष्ठेला न्याय… नगरसेवक राहुल जाधव यांना महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांची बोळवण स्थायी समिती सदस्यपदी निवड करुन करण्याचा प्रयत्न केला. यावर नाराज झालेल्या जाधव यांनी मध्यंतरी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा रुसवा काढण्यात आमदार लांडगे यांना यश मिळाले आहे. तसेच, कॉंग्रेस, मनसे आणि त्यानंतर आमदार लांडगे यांच्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवक जाधव यांना आमदार लांडगे यांच्याप्रति ठेवलेल्या निष्ठेचे फळ मिळाले, असे बोलले जात आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीतील उट्टे फेडले? भाजपचे शहराध्यक्ष तथा लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना संधी दिली. त्यावेळी आमदार लांडगे गटातील इच्छुकांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्याची सल आमदार लांडगे यांच्या मनात होती. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत आमदार लांडगे यांनी आपले समर्थक नगरसेवक राहुल जाधव यांची वर्णी लावून स्थायी समितीच्या निवडणुकीतील उठ्ठे फेडले आहेत, अशी चर्चा पालिकेत होती. विशेष म्हणजे, आमदार जगताप यांनी मंगळवारी महापालिका भवना येणेही टाळले होते. भाजप निष्ठावंतांना पुन्हा ठेंगा… पिंपरी-चिंचवडमधील निष्ठावान भाजप नगरसेवकांना न्याय दिला जात नाही, अशी टीका होत आहे. महापौर पदाच्या निवडणुकीतही निष्ठावान भाजप नगरसेवकांना डावलण्यात आले. नगरसेवक शितल शिंदे आणि नामदेव ढाके यांनी इच्छुक असल्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे “फिल्डिंग’ लावली होती. मात्र, पुन्हा निष्ठावंतांच्या तोंडाला पक्षश्रेष्ठींनी पाने पुसली आहेत, अशी टीका दबक्‍या आजावात केली जात आहे. दुसरीकडे, शितल शिंदे यांना उपमहापौरपदासाठी पसंती दिली होती. मात्र, शिंदेंनी उपमहापौरपदाबाबत नकार दर्शवला आहे, अशीही चर्चा आहे. चिखलीचे राजकीय वजन वाढले… पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता नवे महापौर म्हणून चिखलीतील नगरसेवक राहुल जाधव यांची निवड निश्‍चित झाली आहे. तत्पूर्वी, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने हे सुद्धा याच गावातील आहेत. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या प्रभाग 11 मधील बराचसा परिसर चिखलीतील आहे. याच प्रभागातील संजय नेवाळे क्रीडा समिती सभापती आहेत. तसेच साने यांच्या प्रभाग 1 मधील स्वीनल म्हेत्रे या महिला बाल कल्याण समिती सभापती म्हणून काम पाहतात. एकेकाळी जीवलग मित्र असलेले साने आणि जाधव आता सत्ताधारी आणि विरोधकाच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. महापलिकेतील महापौर आणि विरोधी पक्षनेता अशी दोन्ही महत्त्वाची पदे चिखलीकरांच्या ताब्यात असल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चिखलीचे वजन वाढले आहे. राष्ट्रवादीच्या सत्ता काळात समाविष्ट गावांना डावलले असल्याची ओरड होत असे. पण भाजपच्या काळात समाविष्ट गावांना महत्त्वाची पदे मिळाली आहेत.

  • मावळ न्यूज
  • 01-08-2018 04:50:00
  • 64


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.