साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे निधन

मावळ न्यूज : येथील साधु वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा उपाख्य जे. पी. वासवानी यांचे (वय 99) आजसकाळी (गुरुवारी) नऊ वाजता निधन झाले. दादांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. भारतासह जगभर पसरलेल्या दादांच्या शिष्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अतिशय साधेपणाने जीवन जगणाऱ्या दादांनी नेहमीच शाकाहारासाठी पुरस्कार केला. धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती. दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी साधु वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांसह अन्य क्षेत्रातील मंडळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याचे समजते. लालकृष्ण अडवाणी जेव्हा पुण्यात येत तेव्हा ते दादांची भेट घेत असत. गेल्या काही दिवसापासून रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दादा येत्या 2 ऑगस्ट रोजी शंभर वर्षे पूर्ण करणार होते. त्यांचा शंभरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होता. दादा वासवानी यांनी 150 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पुर्ण नाव जनश पहलराज वासवानी होते. ते ज्या मिशनचे प्रमुख होते त्या संस्थेची स्थापना त्यांचे गुरू टी. एल. वासवानी यांनी केली होती. पुण्यात त्यांच्या साधू वासवानी मिशनचे मुख्यालय असून जगभर त्यांचे आध्यात्मिक केंद्र देखील आहेत. दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैदराबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहेलाजराय होते. पेहेलाजराय हे पेशाने हैदराबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. दादांचे प्राथमिक शिक्षण तेथेच म्हणजेच पाकिस्तानात झाले होते.

  • मावळ न्यूज
  • 12-07-2018 13:07:53
  • 10


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या