इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्व

मावळ न्यूज - तळेगाव येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा पारंपारिक शिक्षणाकडून आधुनिक शिक्षणाकडे कल दिसतो. उच्च शिक्षण पध्दतीमध्ये माहिती तंत्रज्ञान शिक्षणावर भर देत महाविद्यालयामध्ये लवकरच व्हर्चुअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाविद्यालय कटिबध्द आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना असून विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे मत डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. डी. पी. काकडे यांनी वाणिज्य विभागातील अभ्यासक्रमाचा उलगडा करुन विविध विभागातील संधीची माहीत दिली. प्रा. के .व्ही. अडसुळ यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागातील विविध सर्टिफिकेट कोर्सची माहीती देवून स्पर्धा परीक्षेत वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्या अनूषंगाने महाविद्यालयात स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध असून त्याचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक प्रा. डी. पी. काकडे यांनी केले. सूञसंचालन प्रा. पी. के. पानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. आर. भोसले व वाणिज्य विभागातील प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

  • मावळ न्यूज
  • 12-07-2018 07:38:05
  • 9


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.