तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता

मावळ न्यूज - मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावरील बालेकिल्ल्यावरील ताडबंदीला मोठे भगदाड पडले आहे. तटबंदीचा काही भाग पडला असल्याने उरलेला भाग केंव्हाही पडण्याची शक्यता आहे. जर ही तटबंदी ढासळली तर तटबंदीचे दगड किल्ल्याच्या रस्त्यावर पडतील. त्यामुळे गडावर जाणा-या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही तटबंदी पडली तर इतिहासाची पडझड होणार आहे. किल्ले तिकोणागडावरील बालेकिल्ल्यावर जंग्या, पाणी जाण्याचा मार्ग, बुरूज अशा अनेक गोष्टी समाविष्ट असलेली तटबंदी आहे. गडाच्या डाव्या बाजुची तटबंदी काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस व नागरिकांसह शासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. परंतु उजव्या बाजूची सुंदर बुरूज आणि तटबंदी अजूनही शाबूत आहे. त्या बुरुज आणि तटबंदीने गडाचे गडपन जपून ठेवले आहे. पण त्या तटबंदीचा एक 3 ते 5 मिटर लांबीचा तटबंदीच्या खालील काही भाग ब-याच दिवसांपूर्वी ढासळला आहे. त्यामुळे तटबंदी आता अधातंरी राहिली आहे. आता पावसाळा सुरु असल्याने पावसाचे पाणी झिरपून ही तटबंदी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. ही तटबंदी पडल्यास गडावर जाणा-या आणि येणा-या पर्यटकांच्या जीवाला धोका होणार आहे, अशी माहिती गडपाल अक्षय आवताडे यांनी दिली. गडावर येणा-या पर्यटकांना या धोक्याबाबत पुसटशीही कल्पना नसते. आपण उभा राहिलेली तटबंदी कमकुवत झाली आहे. कोणत्याही क्षणी ती पडणार आहे, याबाबत पर्यटक मावळ्यांना माहिती नसते. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्यामार्फत गडावर दुर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजवर संस्थांनी गडावरील मंदिराचा जीर्णोद्धार, तटबंदीवरील लहान मोठी झाडे काढण्यात आली. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. सध्या पुरातत्व खात्याच्या परवानगीने गडावर पाय-यांच्या डागडुजीचे काम सुरु आहे. त्यामुळे तटबंदीबाबत संस्थांच्या पदाधिका-यांकडून भीती व्यक्त केली जात आहे. तटबंदी दुरुस्त करण्यासाठी येणार खर्च मोठा आहे. तसेच किल्ल्यांवर काहीही काम करायचे असल्यास त्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी मिळविणे आवश्यक असते. ही परवानगी मिळविण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. परवानगी आणि डागडुजीच्या खर्चाची व्यवस्था झाली तर तटबंदीची लागणारे साहित्य खालून वर न्यावे लागणार आहे. गडावर जाणारी वाट अगदी अरुंद असल्याने साहित्य नेण्यासाठी अडचण येणार आहे. त्यासाठी साहित्य वाहून नेणारा रोपवे बंधने आवश्यक आहे. रोपवेसाठी आणखी वाढीव खर्चही आवश्यकता आहे. त्यासाठी शासन स्तरावर या कामाची जबाबदारी स्वीकारून इतिहासाचे संरक्षण करावे अशी मागणी गडप्रेमी व शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

  • मावळ न्यूज
  • 11-07-2018 04:57:06
  • 12


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.