पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

मावळ न्यूज - संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. देहू मधील इनामदार वाड्यातून निघून पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात विसावणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पालखी शहराच्या बाहेर पडेल. यादरम्यान पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखी आल्यानंतर ज्या ठिकाणी पालखी आहे, त्या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका या वाहनांना सूट देण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून ते पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत हा बदल असणार आहे. पालखी आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरात पोहोचेपर्यंत 1) देहू फाटा ते भक्तीशक्ती चौकसाठी पर्यायी रस्ता अ) पुण्याकडे येणा-या जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बायपास ब) मुंबईकडे जाणा-या वाहनांकरिता खंडोबाचा माळ उजवीकडे वळून पाण्याची टाकी थरमॅक्स चौक ते देहू रोड 2) भक्ती-शक्ती चौक ते देहू फाटासाठी पर्यायी रस्ता अ) पुण्याकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बायपास मार्गे काळा खडक-डांगे चौक मार्गे वाकड चौक चिंचवड मार्गे इच्छित स्थळी ब) मुंबईकडे जाणा-या वाहनांकरिता खंडोबाचा माळ उजवीकडे वळून पाण्याची टाकी थरमॅक्स चौक ते देहू रोड क) प्राधिकरणाकडे जाणा-या वाहनांकरिता थरमॅक्स चौक, खंडोबाचा माळ, चाफेकर चौक, चिंचवडे फार्म, बिजलीनगर मार्गे प्राधिकरण किंवा टेल्को रोड थरमॅक्स चौक, दुर्गादेवी चौक, चिकन चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे किंवा अंतर्गत रस्त्याने 3) दुर्गादेवी चौक ते टिळक चौकसाठी पर्यायी रस्ता अ) चिकन चौक किंवा थरमॅक्स चौक, खंडोबाचा माळ रस्त्याने 4) म्हाळसाकांत चौक ते टिळक चौकसाठी पर्यायी रस्ता अ) म्हाळसाकांत चौक, खंडोबाचा माळ, संभाजी चौक, बिजलीनगर, चिंचवडे फार्म, रावेत 5) जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील निगडी जकात नाका ते खंडोबाचा माळ दरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पूर्वेकडील पुण्याकडे येणारे सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी दुपारी 2 ते 6 दरम्यान आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. अशा वेळी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा. अ) खंडोबा माळकडून प्राधिकरणाकडे जाणा-या वाहनांनी एस. के. एफ. कंपनी रोडवरून चाफेकर चौक, बिजलीनगर येथून प्राधिकरणाकडे ब) प्राधिकारातून पुण्याकडे येणा-या वाहनांनी बिजलीनगर, चाफेकर चौक मार्गे महावीर चौकातून पुणे-मुंबई मार्गावर जावे. आज पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथून नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी जाणार आहे. या दरम्यान शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. 1) देहू फाटा ते भक्ती-शक्ती चौक ते नाशिक फाटा चौकापर्यंत पर्यायी रस्ता अ) पुण्याकडे येणा-या जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बायपास 2) भक्ती शक्ती चौक ते नाशिक फाटा चौक ग्रेड सेपरेटरच्या डाव्या बाजूचा रस्त्यासाठी पर्यायी रस्ता अ) पुण्याकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता भक्ती-शक्ती चौक ते ग्रेड सेपरेटरमार्गे नाशिक फाटा ब) सर्व्हिस रोडवरून पुण्याकडे जाणा-या वाहनांकरिता प्राधिकरण, भक्ती-शक्ती चौक ते थरमॅक्स चौक मार्गे टेल्को रोड व अंतर्गत रस्ता 3) थरमॅक्स चौक ते खंडोबाचा माळसाठी पर्यायी रस्ता अ) के. एस. बी. चौक किंवा दुर्गा देवी चौक, टेल्को रोडवरून 4) भक्ती-शक्ती चौक ते टिळक चौक सर्व्हिस रोडने पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता अ) ग्रेड सेपरेटर मार्गे पुणे 5) अहिंसा चौक ते महावीर चौकसाठी पर्यायी मार्ग अ) एस. के. एफ. लिंक रोडचा वापर करावा. पुण्याकडे जाण्यासाठी चाफेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, साई चौक मार्गे नाशिक फाटा 6) एस. के. एफ. कंपनी ते खंडोबा माळसाठी पर्यायी मार्ग अ) अहिंसा चौक, चाफेकर चौक, चिंचवडे फार्म मार्गे बिजलीनगर 7) के. एस. बी. चौक ते पिंपरी पोलीस स्टेशन (शिवाजी चौक) साठी पर्यायी मार्ग अ) के. एस. बी. चौकातून, थरमॅक्स चौक, चिकन चौक मार्गे भक्ती-शक्ती चौक ब) टेल्को रोड मार्गे नाशिक रोडवरून पिंपरी 8) मोहननगर कमान ते पिंपरी पोलीस स्टेशन आणि निरामय हॉस्पिटल रस्त्यासाठी पर्यायी मार्ग अ) अंतर्गत रस्ता 9) अजमेरा कॉर्नर ते अहिल्यादेवी चौकसाठी पर्यायी मार्ग अ) अजमेरा कॉलनी, के. एस. बी. चौक मार्गे टेल्को रोडवरून ब) अजमेरा कॉलनी ते प्रेम फर्निचर मार्गे यशवंत चौकातून 10) पिंपरी पूल ते अहिल्यादेवी चौकासाठी पर्यायी मार्ग अ) चिंचवड गाव मार्गे चाफेकर चौक, खंडोबाचा माळवरून ब) ग्रेड सेपरेटरवरून क) पिंपरी पूल लिंक रोडने चाफेकर चौक चिंचवड मार्गे पालखी अहिल्यादेवी चौकामध्ये आल्यानंतर तीन रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 1) पिंपरी पूल पिंपरी चौकामध्ये येण्यासाठी पर्यायी मार्ग अ) लिंक रोडने चिंचवड गाववरून ब) पिंपरी कॅम्प ते जमतानी कॅम्पवरून क) डेअरी फार्म नाशिक फाटावरून 2) नेहरूनगर ते एच. ए. कॉर्नरसाठी पर्यायी मार्ग अ) अजमेरा कॉलनी, टेल्को रोड निगडी ते ग्रेड सेपरेटरमार्गे 3) खराळवाडी ते संत तुकाराम नगरसाठी पर्यायी मार्ग अ) पिंपरी चौकातून ग्रेड सेपरेटरमार्गे पालखी वल्लभनगर चौकामध्ये आल्यानंतर तीन रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 1) पिंपरी पूल पिंपरी चौकामध्ये येण्यासाठी पर्यायी मार्ग अ) ग्रेड सेपरेटर व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे 2) एच. ए. कंपनीजवळील अंडरपास बंद अ) ग्रेड सेपरेटर व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे 3) नेहरूनगर ते डी. वाय. पाटील रस्त्यासाठी पर्यायी मार्ग अ) टेल्को रोडने बाहेर जाता येईल संत तुकाराम नगर ते नाशिक फाट्यापर्यंत पालखी ग्रेड सेपरेटरच्या डाव्या बाजूने जाणार आहे. यावेळी काही रस्त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 1) देहू फाटा, भक्ती शक्तिक चौक, नाशिक फाटा मार्गे दापोडी कडे जाणा-या वाहनांकरिता पर्यायी मार्ग अ) पुण्याकडे येणा-या जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बायपास 2) पिंपरी चौक ते नाशिक फाटासाठी पर्यायी मार्ग अ) भक्ती-शक्ती चौक ते ग्रेड सेपरेटर मार्गे नाशिक फाटा ब) सर्व्हिस रोडवरून जाणा-या वाहनांकरिता भक्ती शक्ती चौक, थरमॅक्स चौक, टेल्को रोड व अंतर्गत रस्त्यावरून 3) नाशिक फाटा ते गुडविल चौकसाठी पर्यायी मार्ग अ) नाशिक बाजूने येणा-या वाहनांनी गुडविल चौकातून नेहरूनगर रोडने पिंपरी चौक किंवा वाळूनाका, टेल्को रोडने, केएसबी चौक, अहिल्यादेवी चौक, पिंपरी पूल शगुन चौकमार्गे 4) वल्लभनगर अंडरब्रिज बंद अ) ग्रेड सेपरेटरने पुणे व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे 5) नाशिक रोडवरून नाशिक फाट्यावर येणारी वाहतूक तसेच पुण्याकडून नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल अ) नाशिक बाजूने येणा-या वाहनांनी वाळूनाका / गुडविल चौकातून टेल्को रोडने के. एस. बी. चौक-चिंचवड स्टेशन-डांगे चौक मार्गे पुण्याकडे ब) एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांनी पिंपरी चौक-पिंपरी कॅम्प मार्गे काळेवाडी / सांगवी-पुणे नागरिकांना पालखी सोहळ्या दरम्यान सुधारित मार्गाविषयी अधिक माहिती हवी असल्यास 26122000 किंवा 26208225 या नंबरवर संपर्क साधता येणार आहे

  • मावळ न्यूज
  • 06-07-2018 04:56:51
  • 88


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.