विधान परिषदेसाठी अखेर भाजपचे 5 उमेदवार जाहीर

मुंबई – विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीने अखेर पाच जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाच जांसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. विद्यमान मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार भाई गिरकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राम पाटील रातोळीकर, ठाण्यातील कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर विदर्भातील नाईक घराण्यातील निलय नाईक यांनाही पक्षाने विधान परिषदेत संधी दिली आहे. निलय नाईक हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे पुतणे आहेत. राष्ट्रवादीचे निवृत्त झालेले आमदार आणि माथाडी नेते नेरेंद्र पाटील यांनाही तिकीट दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र ती खोटी ठरली. भाजपने 5 उमेदवार दिल्यामुळे आता 11 वा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे 11 व्या जागेसाठी अर्ज भरणार आहेत.

  • मावळ न्यूज
  • 05-07-2018 04:20:42
  • 22


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

राज्यातील 88 हजार बूथची रचना भाजपाकडून पूर्ण : दान.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट.. पूर्ण बातमी पहा.