वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सुचन

मावळ न्यूज- आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात येणा-या वारक-यांना अधिक सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी सजग राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या. आज सकाळी (मंगळवारी) भक्ती शक्ती परिसर व आकुर्डी गावठाण येथील विठ्ठल मंदिराच्या मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी केली. त्यावेळी अधिका-यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी 'अ' प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक जावेद शेख, प्रमोद कुटे, नगरसेविका मिनल यादव, वैशाली काळभोर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलै रोजी आगमन होणार असून आकुर्डी येथे मुक्काम असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन ७ जुलै रोजी होणार आहे. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या समन्वयाने आषाढीवारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्याबाबत तसेच पालिकेच्या सर्व संबधित अधिका-यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडून या सोहळ्यात सहभागी वारक-यांना सुविधा देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

  • मावळ न्यूज
  • 04-07-2018 06:18:51
  • 21


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.