अभियांत्रिकीच्या नूतन पॅटर्न चे घवघवीत यश:महाविद्यालयामध्ये नुकताच ''कौतुक

मावळ न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नुकताच जाहीर झालेल्या प्रथम वर्ष निकालामध्ये नूतन अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांनी गुणांची मागील आकडेवारी पार करत उच्चांक गाठला. विद्यार्थ्यांनी सरासरी तसेच विषयवार गुणांमध्ये देखील विद्यालयाचे नाव उंचावले. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचा महाविद्यालयामध्ये नुकताच ''कौतुक सोहळा " झाला. विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी गेलेवर्षभर अतिशय योजनाबद्ध अंमलबजावणी केलेल्या. " नूतन पॅटर्न" चे कौतुक केले. व हे यश या "नूतन पॅटर्नचेच" असल्याचे सांगितले. तुलनेने कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असतानाही सर्व प्राध्यापकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे व विद्यार्थ्यांनी त्यास दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हे यश असल्याचे सांगितले. यावेळी विभागप्रमुख प्रा. आर. जी. बिरादार यांनी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात असलेल्या उत्कृष्ठ सवांदामुळेच असे यश मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या चिकाटी सोबतच शिक्षकांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळाले तर साधारण विद्यार्थी ही विद्यापीठात सर्वप्रथम येतात व नूतन अभियांत्रिकीच्या निकालाने हे सिद्धही झाले. महाविद्यालयाच्या पासष्ट विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी मिळवली तर मयूर चौधरी (९९) याने ग्राफिक्स विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. वैभव शेवाळे, ऋतुजा अरगडे व स्वप्नील घरदाळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे ,विश्वस्त रामदास काकडे ,कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई ,प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे व प्रथम वर्ष विभागाच्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले

  • मावळ न्यूज
  • 04-07-2018 05:46:00
  • 23


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.