राज्यातील 88 हजार बूथची रचना भाजपाकडून पूर्ण : दानवे पाटिल

मावळ न्यूज: बूथ रचनेच्या कामात भाजपने मोठा टप्पा पूर्ण केला असून सुमारे 92 हजार बूथपैकी 88 हजार बूथच्या रचनेचे काम आमच्या पद्धतीने पूर्ण झाले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली . एक बूथ 25 यूथ या प्रमाणे ही रचना करण्यात आली असून उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. गेल्या काही निवडणुकातील भाजपाचा निवडणूक पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भाजपाच्या पद्धतीने बूथ रचना करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षाने या पद्धतीने कामदेखील सुरू केले आहे. मात्र या पातळीवर भाजपा या सर्वांच्या फारच पुढे आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील पक्षाचे बहुतांश आमदार पक्षाचे पदाधिकारी व खासदार अनिल शिरोळे हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत दानवे यांनी पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या कामाचा आढावा घेतला. या कामात चांगली प्रगती असून उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील कामाबाबत दानवे यांनी नापसंती व्यक्त करीत आमदार व पदाधिाकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. या पार्श्‍वभूमीवर या दौऱ्यात पुण्यातील काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. दानवे यांनी पुण्यातील कामाबाबत समाधान व्यक्त केले असले तरी पुणे जिल्ह्यातील कामाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील मतदारसंघाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रातील एक प्रभारी निरीक्षकांनी जिल्ह्यातील बूथ रचनेच्या कामाबाबत कमालीची नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन महिन्यात काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे येत्या काही दिवसात दानवे जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत.

  • मावळ न्यूज
  • 02-07-2018 08:47:33
  • 51


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

विधान परिषदेसाठी अखेर भाजपचे 5 उमेदवार जाहीर .. पूर्ण बातमी पहा.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट.. पूर्ण बातमी पहा.