नगरपंचायत निवडणुकीसाठी 93 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल.

मावळ न्यूज - नुकत्याच नगरपंचायत झालेल्या वडगाव कातवीची नगरपंचायत निवडणूक प्रथमच होत आहे. पहिल्या नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 13 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 80 अशा एकूण 93 जणांनी उमेवारी अर्ज भरला आहे. भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आघाडी यांना प्रत्येकी 17 आणि शिवसेनेच्या चार उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. याव्यतिरिक्त अनेकांनी पक्षादेशाच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी दोघांचे अर्ज आले आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून सुनील ढोरे यांनी अर्ज भरला आहे. तर मयूर ढोरे यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. या दुहेरी लढतीमुळे आघाडीबाबत वडगावकरांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अर्ज माघार घेतल्यानंतरच निवडणुकीचे पक्षीय चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले - मयूर ढोरे, भास्करराव म्हाळसकर, जहीर सोलकर, देविदास जाधव, अंबादास बवरे, सुभाष जाधव, अबोली ढोरे, मनोज ढोरे, मोहन भेगडे, पंढरीनाथ ढोरे, भरत टपाले, सुनील ढोरे, योगेश म्हाळस्कर प्रभागनिहाय दाखल झालेले अर्ज - प्रभाग क्रमांक 1 - दशरथ केंगले (भाजप), दीपक कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस), अन्य दोन प्रभाग क्रमांक 2 - दिनेश ढोरे (भाजप), प्रवीण ढोरे (राष्ट्रवादी), राहुल घुले (शिवसेना), योगेश म्हाळसकर (मनसे), अन्य नऊ प्रभाग क्रमांक 3 - अश्विनी तुमकर (भाजप), शारदा ढोरे (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 4 - वैशाली ढोरे (भाजप), राहुल ढोरे (राष्ट्रवादी), अन्य एक प्रभाग क्रमांक 5 - रुक्मिणी गराडे (भाजप), रेखा दंडेल (राष्ट्रवादी), अन्य एक प्रभाग क्रमांक 6 - अश्विनी वहिले (भाजप), पूजा वहिले (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 7 - अजय पवार (भाजप), चंद्रजीत वाघमारे (राष्ट्रवादी), अन्य तीन प्रभाग क्रमांक 8 - सारिका चव्हाण (भाजप), माया चव्हाण (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 9 - संभाजी म्हाळसकर (भाजप), सुरेश जांभुळकर (राष्ट्रवादी), अन्य आठ प्रभाग क्रमांक 10 - सुरेखा बाफना (भाजप), प्रमिला बाफना (राष्ट्रवादी), अन्य एक प्रभाग क्रमांक 11 - किरण म्हाळसकर (भाजप), सिद्धेश्वर झरेकर (राष्ट्रवादी), अन्य तीन प्रभाग क्रमांक 12 - दिलीप म्हाळसकर (भाजप), गणेश म्हाळसकर (राष्ट्रवादी), अन्य दोन प्रभाग क्रमांक 13 - सुनीता भिलारे (भाजप), पौर्णिमा भांगरे (राष्ट्रवादी), प्रतिभा ढोरे (शिवसेना), अन्य चार प्रभाग क्रमांक 14 - दीपाली मोरे (भाजप), वैशाली सोनवणे (राष्ट्रवादी), मंद पोते (शिवसेना), अन्य दोन प्रभाग क्रमांक 15 - नितीन कुडे (भाजप), संतोष चव्हाण (राष्ट्रवादी), अन्य तीन प्रभाग क्रमांक 16 - सुरेखा म्हाळसकर (भाजप), मीनाक्षी ढोरे (राष्ट्रवादी), सायली म्हाळसकर (मनसे), अन्य एक प्रभाग क्रमांक 17 - अर्चना म्हाळसकर (भाजप), अबोली ढोरे (राष्ट्रवादी), अन्य एक

  • मावळ न्यूज
  • 27-06-2018 03:29:40
  • 64


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.