प्रणवदांच्या भेटीनंतर सदस्यसंख्या चौपट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा दावा

मुंबई, दि. २६ (पीसीबी) - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपुरमधील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावर मुखर्जी यांच्यावर काँग्रेसमधून टीका होऊ लागली होती. मात्र, मुखर्जीच्या भेटीनंतर पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असा दावा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने केला आहे. १ ते ६ जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ३७८ अर्ज दाखल केले आहेत. सध्या सर्वात जास्त अर्ज हे पश्चिम बंगालमधून आले आहेत. ७ जून रोजी आमच्या शिक्षा वर्गाला मुखर्जी यांनी संबोधित केले होते. त्यानंतर संघाकडे १७७९ अर्ज मिळाले आहेत. ७ जूननंतर आम्हाला दररोज १२०० ते १३०० अर्ज येत आहेत. यातील ४० टक्के अर्ज हे बंगालमधील आहे, अशी माहिती संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विप्लव रॉय यांनी दिली. मुखर्जींच्या भाषणामुळे संघाची लोकप्रियतेत वाढ झाली का, असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले की, अशी व्याख्या करणे योग्य ठरणार नाही. मुखर्जी यांच्यामुळे संघाची स्वीकार्यता मात्र वाढली आहे, असे ते म्हणाले. आपल्या कार्यामुळेच संघ लोकप्रिय आहे. परंतु, मुखर्जींच्या भाषणामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. हे त्यामागील प्रमुख कारण असेल, असे ते म्हणाले.

  • मावळ न्यूज
  • 26-06-2018 08:16:49
  • 18


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

आणीबाणीचे विरोधक आणि सर्मथक सत्तेसाठी एकत्र - पंतप.. पूर्ण बातमी पहा.