केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्राचा दूसरा क्रमांक.

मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या आणि लहान शहरांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. अभियानानुसार प्रत्येक शहराच्या कामगिरीची त्रयस्थ संस्थेमार्फत पाहणी केली जाते. यावर्षी कार्वी संस्थेतर्फे झालेल्या पाहणीत दोन गटांतील प्रत्येकी 100 शहरांना स्वच्छ शहरे हा दर्जा देण्यात आला. त्यातील अमृत शहरांच्या गटात (एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या) देशातील पहिल्या 100 शहरांमध्ये महाराष्ट्राची 28 शहरे होती. तर बिगर अमृत शहरांमध्ये (एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या) राज्याची 58 शहरे पहिल्या 100 क्रमांकावर आहेत. काल इंदूर येथे झालेल्या एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारले.

  • मावळ न्यूज़
  • 26-06-2018 05:24:29
  • 78


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

विधान परिषदेसाठी अखेर भाजपचे 5 उमेदवार जाहीर .. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील 88 हजार बूथची रचना भाजपाकडून पूर्ण : दान.. पूर्ण बातमी पहा.