मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्या वतीने एप्रिलमध्ये २०१

मावळ न्यूज़:-  मावळ प्रबोधिनी व मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समितीने संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. मावळ तालुक्यातील समस्त वारकरी सांप्रदयाच्या मार्गदर्शनाखाली  विवाह सोहळा समिती काम करणार आहे. अध्यक्ष ह.भ.प श्री. रोहिदास महाराज धनवे यांनी आपली कार्यकारणी या वेळी जाहिर केली. तसेच मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष मा. रवींद्र ( आप्पा ) भेगडे यांनी व मावळ प्रबोधिनी युवा अध्यक्ष श्री. रवी शेटे यांनी आपली कार्यकारणी जाहिर केली. विशेष म्हणजे या सोहळा समितीचे सल्लागार म्हणुन सर्वांचे मार्गदर्शक, माजी मंत्री मा. मदन बाफना साहेब, जिल्ह्याचे नेते मा. कृष्णराव भेगडे साहेब, मा. दिगंबर भेगडे, मा.माऊली  दाभाडे, मा.पै. चंद्रकात सातकर , श्री. ज्ञानेश्वर दळवी , मा. माऊली शिंदे हे सर्व सल्लागार म्हणुन काम पाहत आहे. 

 

मावळ तालुक्यात हा सोहळा सामाजिक परिवर्तनाचे काम करेल अशी अशा ज्येष्ठांनी व्यक्त केली. 

 या सोहळ्या मध्ये नाव नोंदणी साठी फक्त ११/- ( अकरा रुपये ) शुल्क घेण्यात येणार आहे. सुमारे २०१  जोडपी या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवतील असा सर्व उपस्थितांनी संकल्प केला व आजच १४ जोडप्यांनी आपली नावे नोंदवली. 

 

संस्थेच्या वतीने वधु वरास ३ पोशाख ( साखर पुडा, हळदी व लग्न ) देण्यात येणार आहे, संसार उपयोगी भांडी, गॅस कनेक्शन व भाग्यवान  जोडप्यास देशी वंशाची गाय देण्यात येणार आहे.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे ५००० स्वयंसेवक मा. रवींद्र ( आप्पा ) भेगडे यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याच्या आयोजनात सहभाग नोंदवतील असा विश्वास युवा अध्यक्ष रवी शेटे यांनी व्यक्त केला.

 

या पुढील काळात वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे काम करुन २०१ जोडप्यांचा सहभाग नोंदवतील असा विश्वास, सोहळा समितीचे अध्यक्ष धनवे महारांजीनी व्यक्त केला.

 

मागील ४ वर्ष यशस्वीपणे सामुदायिक सोहळे केल्याचा अनुभव पाठीशी घेऊन हा सोहळा नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरेल असा विश्वास मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष मा. रवींद्र ( आप्पा ) भेगडे यांनी व्यक्त केला. हा सोहळा ५० एकर जागेत पार पडेल, सुमारे १.२५  लक्ष व-हाडी मंडळी  बसतील एवढा मंडप, १ लक्ष लोकांची जेवणाची व्यवस्था, सुमारे २० हजार वाहनांची पार्कींग व्यवस्था या सोहळ्यासाठी केली जाणार असल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगीतले.

  • मावळ न्यूज़
  • 13-01-2019 21:55:00
  • 152


लोकांच्या प्रतिक्रिया

Gajanan jahdav 25-03-2019 01:52:04

Masat

तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.